28.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeनांदेडचव्हाणांच्या प्रचारार्थ आज हांडोरे यांची जाहीर सभा

चव्हाणांच्या प्रचारार्थ आज हांडोरे यांची जाहीर सभा

नांदेड : प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ खा. चंद्रकांत हांडोरे यांची जाहीर सभा दि. दि.१९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वामनराव पावडे मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती भिमशक्ती सामाजिक संघटना प्रदेश सरचिटणीस डॉ. दिनेश निखाते, जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर, शहर जिल्हाध्यक्ष संजय कवठेकर यांनी दिली.

काँग्रेस महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ राज्यसभा खासदार तथा भिमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन, आज शुक्रवार (ता.१९) रोजी करण्यात आले आहे. यावेळी लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण, आ. मोहनराव हंबर्डे, दक्षिण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी. आर. कदम, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, शहर ब्लॉक अध्यक्ष सुभाष रायबोळे, अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल्ल सावंत, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष रेखाताई चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे, महिला काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. करुणा जमदाडे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष सत्यपाल सावंत, भिमशक्ती सामाजिक संघटना प्रदेश सरचिटणीस डॉ. दिनेश निखाते, जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर, शहर जिल्हाध्यक्ष संजय कवठेकर, जिल्हाध्यक्ष शहर दक्षिण शत्रुघ्न वाघमारे, जिल्हाध्यक्ष शहर उत्तर चंद्रकांत भोकरे, शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रमेश गोडबोले, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अतुल पेदेवाड, शहराध्यक्ष शंकर शिंदे, आदी सह इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा काँग्रेस कमिटी तथा भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR