34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeनांदेडसिडकोच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

सिडकोच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

नांदेड : प्रतिनिधी
सिडकोच्या विकासासाठी मी मागील पाच वर्षात भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. सिडकोचे आणि माझे नाते जिव्हाळ्याचे असून पायाभूत सुविधा मिळवून देण्यात मी कुठेही कमी पडलो नाही. यापुढेही सिडकोचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे आश्वासन भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सिडको येथील गुरुवार बाजार येथे झालेल्या जाहीर सभेत दिले. भाजपा महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार बाजार सिडको येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी खा. अशोकराव चव्हाण, अमरनाथ राजुरकर, ओमप्रकाश पोकर्णा, महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, वैजनाथ देशमुख, प्रदेश सचिव देविदास राठोड, नरेंद्र चव्हाण, संजय घोगरे पाटील, जीवन घोगरे पाटील यांची उपस्थिती होती.

खा.चिखलीकर म्हणाले, ही निवडणूक पुढील पाच वर्षासाठी अत्यंत महत्त्वाची असून विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, विकसित मराठवाडा, विकसित नांदेडसाठी भाजपाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे. २०१९ च्या निवडणुकीत नवीन नांदेडच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिले. त्याचप्रमाणे या निवडणुकीतही मला आशीर्वाद द्यावा मी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील, सिडकोच्या विकासासाठी आता चिंता करायची आवश्यकता नाही, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण आपल्या सोबत असून त्यांनीही सिडकोच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला. आता आम्ही दोघेही सिडको आणि परिसराचा कायापालट करू, असे आश्वासन खासदार प्रतापराव पाटील यांनी दिले. नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा पंतप्रधान करायचे आहे ही देशातील तमाम जनतेची इच्छा आहे. मोदी तिस-यांदा पंतप्रधान होणार हे निश्चित असून त्यांचे हात बळकट करा, असे आवाहन त्यांनी केले.

माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनीही सिडको वासियांनी भाजपा व मित्र पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील आणि खा.प्रतापराव पाटील यांना सिडकोतून प्रचंड मताधिक्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. देशातील सर्वसामान्य जनतेची उन्नती व गोरगरिबांना नियमित मोफत अन्नधान्य पुरवठा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून समाजातील तळागाळातील घटकांना, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, पीडित महिला यांना विकासाच्या प्रवाहात आणणे हे त्यांचे स्वप्न आहे. या स्वप्नपूतीर्साठी मोदी हेच पंतप्रधान व्हावेत अशी तमाम जनतेची इच्छा आहे . भाजपाची विचारधारा हीच देशाच्या विकासाला गती देणारी,विकासाकडे यशस्वीरच्या वाटचाल करणारी आहे असेही खासदार चव्हाण म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांनी केले यावेळी भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते महिला बंधूभगिनी व मतदार प्रचंड संख्येने उपस्थित होते. या सभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR