34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रजन्मदात्या पित्यानेच केला तीन मुलांचा खून

जन्मदात्या पित्यानेच केला तीन मुलांचा खून

छ. संभाजीनगर : पित्यानेच आपला एक मुलगा व दोन मुलींचा खून करुन मृतदेह विहिरीत टाकल्याची घटना रविवार १४ मार्च रोजी उघडकीस आलीय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अंबड तालुक्यातील डोमेगाव शिवारात ही घटना घडली आहे. ही तिन्ही भावंडं छ.संभाजीनगर जिल्ह्यातील काद्राबाद कचनेर येथील रहिवाशी आहेत. संतोष ताकवाले असं आरोपी पित्याचे नाव आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कचनेर जवळील काद्राबाद ता. जि. छ. संभाजीनगर येथील संतोष धोंडीराम ताकवाले हा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. या व्यक्तीविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत. अंबड तालुक्यातील डोमेगाव हे संतोष ताकवाले याच्या मामाचं गाव आहे.

दोन दिवसापूर्वी संतोष हा आपल्या तीन मुलांना घेऊन डोमेगाव इथे आला. त्याने तिन्ही मुलांचा खून करुन डोमेगाव येथील एका शेतातील विहिरीमध्ये तिन्ही मृतदेह टाकले. या विहिरीला पाणी कमी असल्याने रविवारी तिन्ही मृतदेह पाण्यावर तरंगत असलेल्या स्थितीत होते. यानंतर आरोपीनं स्वत: फोन करुन पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तिन्ही मृतदेह बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री ८ वाजता अंबड उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

सोहम संतोष ताकवाले (१२), शिवानी संतोष ताकवाले (५), अमृता संतोष ताकवाले (६) अशी तीनही मृत भावंडांची नावे आहेत. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संतोषला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल व अन्य पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. जन्मदात्या पित्यानंचं आपल्या तीन अपत्यांना का ठार केलं? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR