34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातील उमेदवारांनी घेतला मिसळपावचा स्वाद

पुण्यातील उमेदवारांनी घेतला मिसळपावचा स्वाद

पुणे : पुणेरी मिसळ अन पुण्यातील अमृततुल्य (चहा) चांगले प्रसिद्ध आहे. यासाठी विविध कट्टे ठरले आहेत. आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. पुणे लोकसभेतील तिन्ही उमेदवार जाहीर झाल्यामुळे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपकडून मुरलधीर मोहोळ तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर रिंगणात आहेत. त्यात मनसे सोडून वंचित आघाडीत सामील झालेले वसंत मोरे यांनी रंगत आणली आहे. प्रचार करताना उमेदवारांच्या गाठीभेटी होत राहतात. आता मुरलीधर महोळ यांच्या प्रभागात रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे एकत्र आले. त्यांनी मिसळपाववर ताव मारला. परंतु त्यावेळी मुरलीधर मोहळ दुसरीकडे प्रचारात होते.

पुणे शहरात निवडणूक प्रचारात उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. परंतु एकमेकांवर भेटल्यानंतर मैत्रीचे दर्शन होत आहे. पुण्यातील राजकीय संस्कृती जपणारा व्हिडिओ वसंत मोरे यांच्याकडून पोस्ट करण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये वंचित आघाडीकडून मैदानात उतरलेले वसंत मोरे अन काँग्रेसचे रवींद्र धंगेकर मिसळ खाताना दिसत आहेत.

दोन्ही आपआपल्या कार्यकर्त्यांसोबत शेजारी, शेजारी बसून मिसळचा स्वाद घेत आहे. विशेष म्हणजे भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभागात जाऊन त्यांनी मिसळपावचा स्वाद घेतला. त्यावेळी मोहोळ यांची कमतरता जाणवली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR