33.9 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeलातूरजलसंकट : जलपुनर्भरण ही काळाची गरज

जलसंकट : जलपुनर्भरण ही काळाची गरज

शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस काळ कमी कमी होत चालला आहे. त्यामुळे येणा-या काळात पाण्याची मुबलकतेसाठी जमीनीत पाणी मुरवणे आवश्यक असल्याने सध्या जलपुनर्भरण ही काळाची गरज बनली असूून त्यासाठी शासनाकडे न बघता सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा येणा-या काळात भीषण पाणी संकटाला सामोरे जाण्याची भिती निर्माण होणार आहे.

पाणी हे जीवन आहे असे आपण सतत म्हणत असतो. प्रत्यक्षात मात्र त्याचा वापर वाटेल तसा करतो. वरचेवर कमी होत असलेले पर्जन्यमान त्यात पाणी सहज वाहून जाणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन नाही की पावसाच्या पाण्याचे योग्य विल्हेवाट नसल्याने पाणी वाहून जात असून जमीनीतील पाणी पातळी खोलवर जात असून जमीनीतील पाणी पातळीत वाढ करायची असेल तर जलपुनर्भरणाशिवाय पर्याय नाही. शासन राबवित असलेल्या योजना स्थानिक प्रशासन व नागरिकांनी अमलात आणून विहीर, हातपंप, सांडपाणी व पावसाच्या पाण्याचे जलपुनर्भरण करणे आवश्यक आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात ४८ गाव आहेत. तर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ७१५ मिमी एवढे आहे. तालुक्यात मध्यम व लघु प्रकल्प यांसह मांजरा, घरणी नदीचा मोठा किनारा लाभला आहे. तरी पण गेल्या अनेक वर्षापासून तालुक्याचे पर्जन्यमान कमालीचे घटले आहे. तर मोठ्या पावसात पडलेले पाणी नदी मार्गाने वाहून जात असल्याने तालुक्यातील अनेक गावांना अगदी जानेवारी संपताच पाणी टंचाईचे चटके बसायला सुरुवात होतात. त्यात पाणी पातळी खोल गेल्याने विहीरी व विंधन विहिरी देखील कोरड्या पडतात. परिणामी पावसाळा सुरू होई पर्यंत पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR