36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeलातूरज्वारीच्या दरात मोठी घसरण शेतकरी चिंतेत

ज्वारीच्या दरात मोठी घसरण शेतकरी चिंतेत

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुका हा डोंगरी तालुका व अगदी कमी सिंंचन असलेल्या तालुका म्हणून ओळखला जातो परंतु जळकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साठवण तलाव तसेच उच्च पातळी बंधारे झाल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतक-यांंनी यावर्षी उन्हाळी ज्वारीची लागवड केली होती. ज्वारीचे पीक घरी व बाजारात येऊ लागल्याने ज्वारीच्या दरात निम्यापेक्षा अधिक कमी आली आहे.

ज्वारीची लागवड करताना ज्वारीला प्रतक्विंिटल तीन हजार रुपयांच्या वर भाव होता परंतु आता कापसापाठोपाठ ज्वारीच्या दरातही मोठी घसरण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. एक दीड महिन्यापूर्वी ज्वारीला असलेला प्रतिकिं्वटल तीन हजार रुपये दर आता निम्यावर आल्याने शेतक-यामध्येचिंतेचे वातावरण पसरले आहे. जळकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंंचनाच्या सुविधा नसल्याने सिंंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत असे असले तरी तालुक्यांमध्ये या वर्षी अत्यंत कमी पाऊस पडला आहे. यामुळे तालुक्यातील शेतक-यांंनी अधिक पाणी लागणारे रब्बी पीक न घेता यावर्षी उन्हाळी ज्वारीचे पीक घेतले होते. सध्या अनेक शेतक-यांंची ज्वारी काढणी झाली आहे तसेच अनेक शेतक-यांंनी ज्वारी काढण्यास सुरू केलेली आहे. ज्वारीला पाणी कमी लागते यामुळे जळकोट तालुक्यातील तसेच परिसरातील शेतक-यांचा कल ज्वारी पेरणीकडे दिसून आला.

शेतकरी गहू, कांदा, मका असे पिके घेत असताना विहिरींनीही तळ गाठल्यामुळे येथील शेतक-यांंनी कमी पावसात येणा-या ज्वारी पिकाकडे आपला मोर्चा वळविला. आता हे पीक घरात येताच व्यापा-यांंनी ज्वारीच्या दरात घसरण करून शेतक-यांची कोंडी केल्याचे दिसून येत आहे. दीड दोन महिन्यापूर्वी ज्वारीला प्रतिकिं्वटल तीन हजार हजार रुपये दर होता. आजच्या स्थितीत प्रतिकिं्वटल दीड-दोन हजार रुपयांपर्यंत आल्याने शेतक-यामधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे शासकीय हमीभावने ज्वारी खरेदीची मागणी आता जोर धरु लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR