36.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeलातूरजाळ्यात अडकलेल्या उदमांजरास जीवनदान

जाळ्यात अडकलेल्या उदमांजरास जीवनदान

अहमदपूर : प्रतिनिधी
या तालुक्यातील हिपरगा कोपदेव या गावातील शेतकरी अकबर शेख यांच्या शेतात पिकांची नासधूस होऊ नये म्हणून लावलेल्या जाळ्यात उदमांजर अडकल्याचे दिसून आले असता अरमान शेख यांनी लगेच वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी लातूर अंतर्गत काम करीत असलेले शिरूर ताजबंद येथील सर्पमित्र अमोल शिरूरकर,अशोक कांबळे, ऋषिकेश बनसोडे यांना संपर्क साधला. यानंतर शिरूरकर ग्रुपची टीमने गावात जाऊन जाळ्यात अडकलेल्या उदमांजराची सुटका केली आहे.

उदमांजर याचा रंग साधारण काळसर मातकट असतो. मातकट रंगाच्या यांच्या पाटीवर काळे पट्टे असतात या प्राण्याला लांब शेपटी असते टोकाकडे काळसर असलेली मातकट शेपटी झुपकेदार असते. या प्राण्याची लांबी दोन ते आडीच फूट असते याचे वजन चार ते पाच किलो असते. हा प्राणी निशाचर असल्यामुळे मानवी वस्तीजवळ व जंगलामध्ये आढळतो. दिवस भर झाडावरील ढोलींमध्ये अराम करून रात्रीच्या वेळी खाद्याच्या शोधात फिरतो आणि खूपच लाजणारा आहे. हा प्राणी शाकाहारी व मौसाहारी आहे झाडाची फळे, फुले व खेकडे, उंदीर, बेडूक, किडे, पाली, पक्षी व त्याचे अंडी खातो या प्राण्याची मादी २ ते ५ पिलांना जन्म देते.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे साप, पशु, प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात परिसरात प्रामुख्याने चार विषारी साप आढळतात. त्यात नाग, मण्यार, फुरसे, घोणस, तेव्हा शेतक-यांनी शेतात काम करीत असताना घनबुट, हातमोजे वापरावे. सर्पमित्र शिरूरकर ग्रुपने आतापर्यंत चाळीस हजार साप तसेच मोर, हरीन, घोरपड, मगर, उदमांजर, घुबड, अशा वन्यजीव पशु प्राण्यांना जीवनदान दिले आहे. आपल्या परिसरात साप अथवा जखमी पशु प्राणी दिसून आल्यास न घाबरता न मारता आमच्या ग्रुपच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सर्पमित्र अमोल शिरूरकर यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR