38.3 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeलातूरदेवणी तालुक्यातील तलावांत अत्यल्प साठा

देवणी तालुक्यातील तलावांत अत्यल्प साठा

देवणी : बाळू तिपराळे
एकीकडे तालुक्यावर दुष्काळाची गडद छाया पसरली असताना धनेगाव बॅरेजमघ्ये सध्या केवळ ३१ टक्के, पाणी साठा असल्याने हे पाणी पिण्यासाठी आरक्षित केले असले तरी, बॅरेज परिसरातील शेतक-याांंकडून शेतीसाठी बेसुमार पाणी उपसा होत असल्याने पाटबंधारे विभाग महसूल विभाग व महावितरणच्या वतीने संयुक्त कारवाई करीत प्रकल्प क्षेत्रातील विद्युत पुरवठा खंडित केला आहे.

पावसाळ्यात तालुक्यात कधी मध्यम तर कधी रिमझिम पिकापुरता पाऊस पडत गेला. त्यामुळे ंिवंधन विहिरींचे पाणी पातळी वाढली नाही. त्याचबरोबर धनेगाव, बॅरेजमघ्ये पाणलोट क्षेत्रात ही दमदार पाऊस न झाल्याने प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही. सध्या धनेगाव ३१ टक्के, एवढा बॅरेजमघ्ये पाणीसाठा शिल्लक आहे. छोटे-मोठे प्रकल्प नदी, नाले, कोरडे आहेत. त्यामुळे दुष्काळाची छाया गडद दिसत आहे. अशा परिस्थितीत व भविष्यात होणा-या पाणीटंचाईच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांनी या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे मात्र जिल्हाधिका-याच्या आदेशाला न जुमानता या प्रकल्पातून सिंंचनासाठी पाण्याचा उपसा केला जात आहे.

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. ख-या अर्थाने उन्हाळ्याचे दिवस पुढे आहेत. किमान तीन महिने याच प्रकल्पातील पाणी साठ्यावर नागरिकांना आपली तहान भागवावी लागणार आहे. सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा अत्यल्प असल्याने भर उन्हाळ्यातच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते की काय ? अशी शंका निर्माण झाली आहे. त्याच वेळोवेळी पाणी उपसा करण्यावर संबंधित प्रशासनाने निर्बंध घालून ही काही शेतकरी पाणी उपसा करीत आहे याची दखल घेत धनेगाव बॅरेजमधील दोन आठवड्यापूर्वीच पाटबंधारे विभाग व महसूल विभागाने मोटारी काढून टाकल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR