30.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडेंनी बीड सांभाळावे, केलेली वक्तव्ये अंगलट येतात

पंकजा मुंडेंनी बीड सांभाळावे, केलेली वक्तव्ये अंगलट येतात

छगन भुजबळांचा पंकजांना सल्ला

मुंबई : नाशिकच्या जागेसंदर्भात महायुतीकडून निर्णय होत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरु आहेत. त्यातच पंकजा मुंडेंनी नाशिकमधून प्रितम मुंडेंना तिकीट देईन, असे विधान केले होते. पंकजा मुंडेंना आता छगन भुजबळांनी सल्ला दिला असून त्यांनी अगोदर बीड सांभाळावे कारण केलेली वक्तव्ये अंगलट येतात असे ते म्हणाले आहेत.

बीडच्या सभेत बोलताना गुरुवारी पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, मी प्रितम मुंडेंना विस्थापित करणार नाही हा माझा शब्द होता. मुळात हे तिकीट मला नकोच होते. मी ते मला नका देऊ म्हणत होते. परंतु आता मी निवडणुकीच्या मैदानात आहे. प्रतिम यांना मी विस्थापित करणार नाही. प्रितम यांचे काहीच अडलेले नाही, मी प्रितम यांना नाशिकमधून उभे करेन, असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

पंकजा मुंडेंच्या या विधानावर भुजबळांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, पंकजा मुंडेंनी अगोदर बीड सांभाळावे. बीडमध्ये १३ तारखेला निवडणुका आहेत. त्यांनी तिकडे लक्ष देवून निवडून येणे महत्त्वाचे आहे. नाशिकमध्ये उमेदवार नाहीत, असे नाहीये. उमेदवार खूप आहेत हीच अडचण आहे. पंकजा मुंडेंनी सगळ्यांना बरोबर घेऊन निवडून यावे. माझ्या तिकीटाचा निर्णय हा मराठा समाज नाराज होता म्हणून नाही आहे. उलट मराठा समाज माझ्याबरोबर होता. अनेकांनी मला समर्थन देऊन निवडणुकीत मदत करणार असल्याचे सांगितले होते. नाशिकचा निर्णय हा महायुती घेईन असे भुजबळ म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR