34.5 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeराष्ट्रीयबसपा आमदार राजू पाल हत्याकांडातील सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

बसपा आमदार राजू पाल हत्याकांडातील सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

लखनौ : उत्तर प्रदेशातील बहुचर्चित राजू पाल हत्येप्रकरणी लखनौच्या सीबीआय न्यायालयाने सातही आरोपींना दोषी ठरवले आहे. न्यायाधीशांनी आरोपी फरहानला बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी चार वर्षांचा कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर इसरार अहमद, रणजित पाल, जावेद, आबिद, गुलशन आणि अब्दुल कवी यांना हत्येप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेप आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणात अतिक अहमद आणि अशरफ यांनाही आरोपी करण्यात आले होते. मात्र, अलीकडेच अतिक आणि अश्रफ यांची काही तरुणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तर हयात असलेल्या आरोपींना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी शिक्षा सुनावली. २५ जानेवारी २००५ रोजी अलाहाबाद पश्चिमेतील बसपा आमदार राजू पाल यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

या गोळीबारात देवी पाल आणि संदीप यादव यांचाही मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. या हत्याकांडाच्या अवघ्या १६ दिवस आधी आमदार राजू पाल यांचा पूजा पालशी विवाह झाला होता. पूजा पाल यांच्या तक्रारीनंतर धूमनगंज पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR