33.2 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरबायकोचा खून करून नवरा पोलिस ठाण्यात हजर

बायकोचा खून करून नवरा पोलिस ठाण्यात हजर

सोलापूर – बायकोचा निर्घृणपणे खून करुन नवरा थेट पोलीस ठाण्यात हजर झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी स्वागत नगर वीटभट्टीसमोर उघडकीस आली. यास्मीन सैफन शेख (वय- ४०, रा. ६०६ पाथ्रुड चौक, शहापूरे यांच्या घरात भाडेकरु, सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

आरोपी पतीने पत्नीचा खून करून हत्यारासह स्वत:ला एम आय डी सी पोलीस ठाण्यात जाऊन अटक करून घेतली. मृत महिलेचा मृतदेह शहरातील स्वागत नगर परिसरातील वीटभट्टी च्या आवारात मिळून आला. यातील मयत यास्मिन शेख ही महिला पाथ्रुड चौकातील शहापूरे यांच्या घरामध्ये पतीसह भाड्याने राहत होती. रविवारच्या मध्यरात्रीनंतर १.३० च्या सुमारास महादेव केंगनाळकर यांच्या स्वागतनगर येथील दिकोंडा कॅन्टिनसमोर आलेल्या वीटभट्टीजवळ सदर महिलेच्या मनगटावर, पोटावर पतीने तिक्ष्ण हत्याराने वार करुन टाकल्याने ती बेशुद्धावस्थेत आढळूृन आली.

दरम्यान, नव-याने हत्यारासह एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून स्वत:ला अटक करवून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. खबर मिळताच हवालदार एस. के. चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्धावस्थेतील महिलेला पहाटे तीनच्या सुमारास येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली, मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. एमआयडीसी पोलिस खून नेमक्या कोणत्या कारणासाठी झाला याचा शोध घेत आहेत.

मयत महिलेचा भाऊ अरबाज शेख याने भाऊजी सैफन शेख यांच्यावर आरोप करताना त्याने एकट्याने हा खून केला नाही तर त्याच्यासोबत इतरांनी मिळून हा खून केल्याचा आरोप केला आहे, त्यांनाही शिक्षा व्हावी अशी मागणी केली

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR