34.1 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeलातूरभक्तीस्थळाच्या विकासासाठी शासन कटिबध्द

भक्तीस्थळाच्या विकासासाठी शासन कटिबध्द

अहमदपूर : शहर प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंधारणाची अधिकाधिक कामे करावीत जेणे करुन या भागाच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले. डॉ. शिवंिलग शिवाचार्य महाराज भक्तीस्थळ येथे रस्त्याच्या लोकार्पण व भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी प्रथम पसंती पाण्याला द्यावी. जलसाधारणाच्या कामाकडे विशेष लक्ष द्यावे, राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या कामातून आमच्या विभागाने १८.७२ क्यूबीक मीटर पाणी स्टोरेज होईल असे काम केले आहे. रस्ते झाले, भांडवली गुंतवणूक झाली आता नदी पात्रात पाणी राहिले, विहिरीला पाणी वाढले तरच रोजगार वाढतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

गडकरी भाषण करीत असताना कोणीतरी लातूर-टेंभूर्णी रस्त्याची आठवण करून दिली. तेंव्हा त्यांनी या रस्त्याविषयी बोलायलाही मला लाज वाटतेय असे सांगून या कामात कांिहनी घाण केली होती पण या रस्त्याच्या कामासंदर्भातील अडचणी दूर करुन या कामास आपण मंजूरी देत असून लवकरच हे काम पूर्ण होईल, असे गडकरी यांनी सांगितले. या कार्यक्रमास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर श्रृंगारे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आ. बाबासाहेब पाटील, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, आ. रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर,भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख,भाजपा प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार बब्रुवान खंदाडे,माजी आ. सुधाकर भालेराव, माजी आ. गोंिवद केंद्रे, आचार्य गुरुराज स्वामी महाराज, मनोहर धोंडगे, माजी सभापती भारत चामे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, सौ.अयोध्या केंद्रे, माजी नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे, माजी नगरसेवक डॉ. सिद्धार्थकुमार सुर्यंवशी, जिल्हा उपाध्यक्ष गोंिवद गिरी, तालुकाध्यक्ष प्रताप पाटील यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR