38.3 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeपरभणीमहिला बचत गटाच्या वस्तुंचे विक्री व प्रदर्शन

महिला बचत गटाच्या वस्तुंचे विक्री व प्रदर्शन

परभणी : जागतिक महिला दिनानिमित्त यशस्विनी महिला उद्योजिका संस्था परभणी यांच्या वतीने शहरातील वसमत रोडवरील जागृती मंगल कार्यालय येथे दि.१२ ते १४ मार्च दरम्यान महिला बचत गट व महिला गृह उद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

परभणी विधानसभा मतदार संघातील महिला बचत गट, महिला गृह उद्योजिका यांना जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री स्टॉल मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

नवउद्योजकांच्या व्यवसायाची ओळख जनसामान्य जनतेमध्ये होऊन त्यांचा व्यवसाय वृध्दीगंत व्हावा, लघुउद्योगांना चालना मिळावी यासाठी आ. डॉ.राहुल पाटील यांची तळमळ असून त्यांच्या सहकार्य आणि पुढाकारातून महिलांनी तयार केलेल्या उत्कृष्ट वस्तूंना योग्य दर मिळण्यासह थेट उद्योजक ते थेट ग्राहक हे नाते जोडले जावे या हेतूने यशस्विनी महिला उद्योजिका संस्था यांच्या वतीने जागृती मंगल कार्यालयात बचत गटाच्या वस्तुंचे विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध प्रकारचे घरगुती मसाले, पापड, कुरुड्या, मोत्यांच्या तसेच सजावटीच्या वस्तू अन्य खाद्यपदार्थ मोत्यांच्या रांगोळ्या, पूजेचे ताट, सौंदर्यप्रसाधने आदी विविध वस्तूंचा यामध्ये समावेश असणार आहे.

बचत गटाच्या स्टॉलला दररोज भेट देणा-या महिलांसाठी लकी ड्रॉ काढून विजेत्या महिला ग्राहकास आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात येणार आहे. १२ ते १४ मार्च दररोज सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत जागृती मंगल कार्यालय येथे प्रदर्शन भरण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक तथा शिवसेना महिला आघाडीच्या विधानसभा संघटक सौ.अंबिका अनिल डहाळे यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR