38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeअंतरराष्ट्रीयहवेत पॅराशूट न उघडल्याने ५ जणांचा मृत्यू

हवेत पॅराशूट न उघडल्याने ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : गाझामध्ये मदत सामुग्री असलेले पॅराशूट अंगावर पडून पाच जणांचा मृत्यू झाला. पॅराशूट हवेत उघडले न गेल्याने ते मुक्तपणे खाली कोसळले. यात पाच जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले.

हमासकडून चालवल्या जाणा-या आरोग्य विभागाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. हवेत पॅराशूट उघडले गेले नाही आणि मदत सामुग्री खाली उभे असलेल्यांच्या लोकांवर पडली. कोणाकडून पाठवलेली ही मदत होती हे कळू शकलेले नाही.

यूएस, जॉर्डन, इजिप्त, फ्रान्स, नेदरलँड आणि बेल्जियम गाझामध्ये गेल्या काही दिवसांपासून मदत पुरवत आहेत. इस्राइलसोबतच्या संघर्षामुळे गाझामधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. स्थानिक वेळेनुसार ११:३० वाजता हा अपघात घडला.

युनायटेड नेशन्सच्या माहितीनुसार, जवळपास २३ लाख लोकसंख्या ही उपासमारीच्या उंबरठ्यावर आहे. अनेक लहान मुले अन्नासाठी तडफडत आहेत. दरम्यान, हमास आणि इस्राइल सैन्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून भीषण संघर्ष आहे. अद्याप हा संघर्ष थांबण्याचे चिन्हे नाहीत. इस्राइलने आक्रमक पवित्रा घेतला असल्याने अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR