39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूररबीमध्ये पीककर्ज वाटपात बँकांचा आखडता हा

रबीमध्ये पीककर्ज वाटपात बँकांचा आखडता हा

सोलापूर: यंदाच्या खरिपात पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे सावट होते. रबी हंगामही दुष्काळाच्या सावटातच गेला. परतीच्या पावसानेही सोलापूर जिल्ह्याची निराशा केली. रबी हंगामातही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. दुष्काळाचे सावट जिल्ह्यावर असल्याने बँकांनी पीककर्ज वाटपात सुरवातीपासूनच आखडता हात घेतल्याचे दिसते.

यंदा पावसाअभावी खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. यावर्षीच्या खरिपाकडून शेतकऱ्यांना चांगल्या अपेक्षा आहेत. आणखी एक महिन्यानंतर खरीप हंगामाची प्रशासकीय तयारी सुरू होईल. यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारी पीककर्ज वाटपाला प्रशासनाने प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना मुबलक कर्ज मिळाल्यास शेतकऱ्यांना किमान प्रशासनाकडून दिलासा तरी मिळेल.

जिल्हाधिकाच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने वार्षिक पतपुरवठ्याचा आराखडा केला आहे. या आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक आहे.एयु फायनान्स,ईक्वीटास बँक,जनलक्ष्मी बँक, सर्वोदय एसएफबी, उज्जीवन बँक यांना जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्্যান उद्दिष्ट देण्यात आले आहे.

या बँकांनी फेब्रुवारी अखेरपर्यंत किती कर्ज वाटप केले आहे, याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त नाही, या बँकांनी पीक कर्ज वाटप केले नाही की माहिती देण्यास बँका टाळाटाळ करतात ? याचा प्रशासनाने शोध घेण्याची गरज आहे.मोठ्या कर्जदारांनी जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आल्यापासून शेतकर्‍यांना पीककर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज मिळताना अडचणी येत आहेत बँकेकडून मध्यम उद्योग कर्ज बंद झाल्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांचा विकास थांबला आहे. उताऱ्यातील अनावश्यक नोंदीमुळे राष्ट्रीयकृत बँका शेतकर्‍यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. शेतकर्‍यांना खासगी सावकाराशिवाय पर्याय उरला नाही.ही वस्तुस्थीती आहे.

पीक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतकर्‍यांना कर्जपुरवठा व्हावा यासाठी सर्व बँकांना सूचनादेण्यात आल्या आहेत. वार्षिक पतपुरवठा आराखड्यात दिलेल्या उद्दिष्टानुसार कर्जवाटप व्हावे यासाठी बँकांशी समन्वय व संपर्क ठेवला जाईल असे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR