40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाजिम्नॅस्टिक खेळाडूंसाठी साहित्य, कोर्टचा अभाव

जिम्नॅस्टिक खेळाडूंसाठी साहित्य, कोर्टचा अभाव

सोलापूर : शहरामध्ये साहित्य व कोर्ट उपलब्ध नसल्याने जिम्नॅस्टिककडे खेळाडूंचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनने खेळाच्या साहित्यासाठी माजी क्रीडा अधिकारी तारळकर यांना निवेदन दिले होते. मात्र क्रीडा विभागाकडून नुसतेच आश्वासन देण्यात आले. मागणीची पूर्तता झाली नसल्याने खंत व्यक्त करण्यात होत आहे.

त्याचप्रमाणे साहित्याचा अभाव असल्याने खेळाडूंचा सहभाग कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सरावा करिता कोर्ट व साहित्य महत्त्वाचे असून या मागण्यांकडे जिल्हा क्रीडासंकुलाने लक्ष घालण्याची गरज आहे. त्यामुळे प्रशिक्षण शिबिर आयोजित करून शिबिरामार्फत नव्या खेळाडूंना संधी उपलब्ध करता येणार असल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात येत आहे.

तसेच जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून साहित्य उपलब्ध करून दिल्यास नवे खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे.शहरातील खेळाडूंना आठ वर्षांपासून जिम्नॅस्टिक खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.खेळामध्ये आजपर्यंत शेकडो खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे. मात्र जिम्नॅस्टिक खेळाला साहित्य व कोर्ट उपलब्ध नसल्याने खेळाडूंचे खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा क्रीडा संकुलाचे माजी क्रीडा अधिकारी नितीन तरळकर यांच्याकडे साहित्य व कोर्टची मागणी करण्यात आली होती.

मात्र, अद्याप मागणीची पूर्तता झाली नाही. साहित्य व कोर्ट खेळाडूंना उपलब्ध झाल्यास नवे खेळाडू तयार होण्यास मदत होईल.असे सोलापूर जिम्नॅस्टिक असोसिएशनचे सचिव संतोष खंडे यांनी सांगीतले.

आर्टिस्टिक, रिदमीक, एरोबिक जिम्नॅस्टिक, ट्रॅम्पोलिन हे जिम्नॅस्टिक खेळातील चार प्रकार आहेत.शहरामध्ये एक्रोबॅटिक प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाते. सोलापूर शहराबरोबर सांगोला, कुर्डुवाडी, करमाळा या तालुक्यांमध्ये सराव होतो . तालुक्यांमधून ९० हून अधिक खेळाडू तर शहरांमधून ५० खेळाडू सराव करतात . राज्यस्तरीय स्पर्धेत ५० तर विभागीय स्पर्धेत शंभरहून अधिक खेळाडूंचा सहभाग असतो.

शहरांमध्ये दोन वेळा प्रशिक्षण शिबिरामध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तर राष्ट्रीय खेळाडूंमार्फत खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR