28.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रराजकारणाचा स्तर घसरू नये : डॉ. कोल्हे

राजकारणाचा स्तर घसरू नये : डॉ. कोल्हे

विनायक कुलकर्णी
पुणे : प्रतिनिधी
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना या राजकारणाच्या रिंगणात ओढणे चुकीचे आहे . राजकारणातील सुसंस्कृतता प्रत्येकाने जपली पाहिजे अशी प्रतिक्रिया शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांना सांगितले. निवडणूक येते जाते, पद येतात जातात पण राजकारणाचा स्तर घसरू नये ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे असेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना कोल्हे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार मोठे नेते आहेत. मी जे काही केले ते स्वकर्तुत्वाने केले, माझे काका नटसम्राट नव्हते. ते जर मला नटसम्राट म्हणून म्हणत असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतली कामगिरी बघावी,मग त्यांना कळेल.

महायुतीला अजूनही उमेदवार आयात करावे लागतात,असे एका प्रशनाला उत्तर देताना ते म्हणाले, उत्तर भारतात हीच परिस्थिती आहे. भाजपची मिळालेली तिकीट ही परत करत आहेत. महायुती अजूनही बॅकफूटवर आहे. महायुतीत अंतर्गत धुसपुस आहे. मुद्दे नसल्याने खोटं बोल पण रेटून बोल अस म्हणत डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना सदिच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR