40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रराम मंदिरात सितेची मूर्ती असावी

राम मंदिरात सितेची मूर्ती असावी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या तिघांच्या उपस्थितीत तसंच साधू-संतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यातच परवा अयोध्येतल्या मंदिरात रामनवमी साजरी झाली आणि सूर्यतिलक सोहळाही पार पडला. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन सवाल करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.

याविषयी बोलताना शरद पवार यांनी एका मिटिंगमध्ये माझ्यापुढे विषय निघाला त्यात महिलांनी अशी तक्रार केली की रामाचे सगळे बोलत आहात मग सीतेची मूर्ती का बसवत नाही? मी महाराष्ट्रात फिरतो आहे. मला अनुकूल चित्र दिसत आहे. राम मंदिर होऊन गेलं आता त्याविषयी लोकांमध्ये चर्चा नाही. तसंच या सरकारविषयी नाराजी आहे असे शरद पवार म्हणाले. शरद पवारांना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल का? हा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR