28.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनवरदेवाने लग्नाआधी केले मतदान

नवरदेवाने लग्नाआधी केले मतदान

भंडारा : मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देत लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील गणेश टिकाराम कावळे या नवरदेवाने वरात निघण्याआधी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आधी लगीन लोकशाहीचे, अशी प्रतिक्रिया आता गावात उमटत आहे.

डोक्याला मुंडावळ्या बांधून व-हाड्यांसह गणेश हा युवक लाखांदुरातील मतदान केंद्रावर सकाळीच दाखल झाला. रांगेत लागून त्याने स्वत: आणि त्याच्या नातेवाईकांनी मतदानाचा हक्क बजावला. एवढेच नाही, तर राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याची पोजही त्याने दिली. त्यानंतर वरातीसह ते सर्वजण वधुच्या गावाकडे मार्गस्थ झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR