34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्र‘कचा-कचा’ची चौकशी होणार

‘कचा-कचा’ची चौकशी होणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निधी पाहिजे तर कचा-कचा बटण दाबा, आम्हाला मतदान करा नाहीतर निधीबाबत हात आखडता घ्यावा लागेल असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता.

अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या भागाला निधी देण्यासाठी मी कमी पडणार नाही. मात्र तुम्ही मतदान करायला गेल्यावर मशीनमध्ये देखील आपल्या उमेदवाराच्या समोरचे बटन दाबा कचा-कचा म्हणजे मला सुध्दा निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा पण हात आकडता येईल असे म्हणतातच सभेमध्ये अशा पिकला. ते इंदापुरात व्यापारी वकील संघटनेच्या बैठकीमध्ये बोलत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR