रेणापूर : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त रेणा सहकारी साखर कारखानास्थळी उभारलेल्या लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळा व स्मृतीसंग्रहालय स्थळी आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर ऊसउत्पादक शेतकरी यांच्याकरीता बेणे, लागवड, ऊस पिक रोग प्रतिबंध व उपाययोजना, ऊस उत्पादनामध्ये वाढ, पाणी व्यवस्थापन, अक तंत्रज्ञान वापर याविषयी सखोल माहिती व्हावी याकरीता कारखान्याच्या वतीने ऊस विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अॅड प्रवीण पाटील व माजी चेअरमन तथा संचालक सर्जेराव मोरे व कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर-देशमुख यांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले. त्यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या कार्यास उजाळा दिला. त्यानंतर ऊस विकास मेळाव्यात वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट, पुणे यांचे तज्ज्ञ सल्लागार डॉ. राजेंद्र भोईटे, डॉ. गणेश कोंडगिरे, डॉ. तुषार शितोळे व एम.सी.सी कंपनीचे मयूर बेगडे यांनी माहिती दिली. आभार प्रदर्शन मुख्य शेतकी अधिकारी एस.एस. भोसले यांनी केले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर देशमुख, व्हाईस चेअरमन अॅड. प्रवीण पाटील, माजी चेअरमन तथा संचालक सर्जेराव मोरे यांच्यासह कारखान्याचे संग्राम माटेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, तानाजी कांबळे, तुकाराम कोल्हे, शंकरराव पाटील, गोविंद पाटील, रणजित पाटील, बालाजी हाके, पंडीतराव माने, स्रेहलराव देशमुख, नरसिंग इंगळे, कार्यलक्षी संचालक आण्णासाहेब पाटील, तक्रार निवारण समिती सदस्य, उमाकांत देशमुख, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे, पंचायत समीती सदस्य, बालाजी गोटके, माजी संचालक संजय हरीदास, डॉ. नारायण देशमुख, ऊसउत्पादक शेतकरी, सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
















