लातूर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मंगळवार दि. २६ मे रोजी लातूर लायन्स विरुद्ध चाकुर चार्जर्स या दोन संघात अंतिम सामना खेळवला गेला. यामध्ये चाकूर चार्जस संघाने अप्रतिम खेळी करत विजय संपादन केला. प्रथम विजयी संघाचे कॅप्टन डॉ. धनंजय पडवळ यांना रोख २,२१,००० रुपये, उपविजेता संघाचे कॅप्टन विशाल गायकवाड यांना १,११,००० रुपये व मालिकावीर एम. डी. मोहम्मद यांना ३१००० रूपयांचे पारितोषिक व ट्रॉफी देवून गौरवण्यात आले. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला मागील ३ वर्षांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदा स्पर्धा नव्या स्वरूपात होत आहेत.
लातूर लायन्स विरुद्ध चाकुर चार्जस या दोन संघात अंतिम सामना २५ मे रोजी होणार होता. मात्र पाऊस पडल्या कारणाने हा अंतिम सामना २६ रोजी खेळवण्यात आला. २५ मे रोजी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख व सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांच्या हस्ते वुमेन्स लातूर सीटी किंग्ज संघाला विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख, सौ. दीपशिखा धिरज देशमुख, वंश धिरज देशमुख, दिवियाना धिरज देशमुख यांच्या हस्ते महिला संघाची कॅप्टन क्षितीजा लोमटे यांना २१,००० रुपये व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. तसेच युवा फाऊंडेशन तर्फे रोहन एनाडले यांना १,२१,००० रुपये, लोकनेते विलासराव देशमुख स्पोर्ट्स स्कॉलरशीपचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी २५ मे रोजी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख, सौ. दीपशिखा धिरज देशमुख, वंश धिरज देशमुख, दिवियाना धिरज देशमुख यांच्या हस्ते ‘चषकाचे’ अनावरण करण्यात आले. या स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले होते. या दरम्यान तरुणांचा उत्साह प्रचंड राहीला व प्रेक्षकही उपस्थित राहीले याबद्दल आयोजन समितीने सर्वांचे आभार मानले.
















