Homeमहाराष्ट्ररोहित पवार अजून लहान, त्यांच्याविषयी नाही बोलणार

रोहित पवार अजून लहान, त्यांच्याविषयी नाही बोलणार

शिर्डी : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल केलेल्या वक्तव्यमुळे वाद निर्माण झाला. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली. शिवाय त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांच्या ट्विटबाबत आव्हाडांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

रोहित पवार काय बोलतात त्याला मी फार महत्व देत नाही. ते अजून लहान आहेत. त्यांची ही पहिलीच टर्म आहे. मला त्यांच्यावर जास्त बोलायचं नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR