41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडवाह रे प्रशासन... विष्णुपुरीत वाहतुकीची कोंडी

वाह रे प्रशासन… विष्णुपुरीत वाहतुकीची कोंडी

नांदेड: प्रतिनिधी
नांदेड- लातूर महामार्गावर विष्णुपुरी येथे गेल्या ८ महिण्यापासुन उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. एका बाजूने रस्ता बंद केला त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. रुग्णालयात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावे लागत असून प्रशासनाला कुठलेही गार्भीय नाही, यामुळे काम संथगतीने होत आहे. सोमवारी सकाळीपासुन तर वाहतुक कोडींने कहर केल्याने वाहनांची मोठी रिघ लागली होती.

एखादा गंभीर रुग्ण वाहतुकीच्या कोंडीत अडकला तर त्याचा जीव गमवावा लागेल असे भीती निर्माण झाली आहे. काम संत गतीने सुरू असून शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. नांदेड – लातूर महामार्गाचे काम एक वर्षापासुन सुरू असुन विष्णुपुरी येथे ८ महिन्यांपासुन उड्डाणपूल होत आहे. त्यामुळे वाहतूक एकतर्फी वळवण्यात आली. रुग्णालयात जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता असून विद्यापीठ, शाळा महाविद्यालयास जाण्यासाठी रस्त्याचा वापर केला जातो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ सुरू असते

.गेल्या अनेक दिवसापासून रस्त्याचे काम संथातीने काम सुरू असून जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे र्दुलक्ष होत आहे. दोन्ही बाजूचा रस्ता सुरू झाला तर वाहतुक सुरळीत होईल. एक रस्ता बंद केल्यामुळे दुतर्फा वाहतूक एकाच रस्त्याने वळविण्यात आली आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. सोमवारी सकाळपासून वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. वाहतुक पोलिस मदत करीत आहेत मात्र एकतर्फी वाहतूक असल्यामुळे वाहतुकीची कोंडी कायमच होती. यामुळे दुपारपर्यत वाहतूक ठप्प झाली होती. जिल्हा प्रशासनाने रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी तात्काळ गुत्तेदारास ताकीद द्यावी, दोन्हीही रस्त्याचे काम पूर्ण करावेत अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR