34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeनांदेडमॅफ्को परिसरातील इमारतीला आग

मॅफ्को परिसरातील इमारतीला आग

नांदेड : प्रतिनिधी
शहरातील मॅफ्को परिसरातील एका इमारतीला १७ मार्च रोजी मध्यरात्री भीषण आग लागली. मनपाच्या अग्नीशमन दलाने मोठी कसरत करून ही आग आटोक्यात आणली. सोबतच इमारतीच्या गोदामात अडकलेल्या एका व्यक्तीची सुखरूप सुटका करून जीवदान दिले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

शहरातील मॅफ्को मार्गावरील खय्युम फ्लॅटमधील शेख चांद यांच्या इमारतीला १७ रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच इमारतीवरील गोदामापर्यत आग पोहचून स्क्रॅप, गाडीचे रेडियटर व कुलंटने पेट घेतला. ही माहिती मिळताच मनपाचे अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे व त्यांचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीचे भिषण रूप पाहता दासरे यांनी आणखी दोन बंब तातडीने बोलावून घेतले.

अंत्यत कसरत करीत आग विझविण्याचे काम सुरू केले. यानंतर एमआयडीसी येथील एक बंब व कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. या आगी दरम्यान इमारतीवरील गोदामात एक व्यक्ती अडकल्याचे कळताच अग्नीशमन अधिकारी दासरे व जवानांनी धाव घेत शेख अफरोज नावाच्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली. तब्बल पाऊन तासाच्या परिश्रमानंतर दासरे, गायकवाड, लांडगे, खेडकर, तोटावर, कांबळे आदीनंी आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगी दरम्यान एका व्यक्तीचा जीव वाचविल्याबद्दल मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी अग्नीशमन दलाचे कौतुक केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR