31.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeलातूरशृंगारे यांना मराठा फॅक्टरचा फटका बसणार ...?

शृंगारे यांना मराठा फॅक्टरचा फटका बसणार …?

उदगीर : बबन कांबळे
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्या पक्षाचे त्या त्या मतदारसंघामध्ये दौरे सुरू आहेत. लातूर मतदारसंघाचा प्राधान्याने विचार केला तर भाजपाकडून सुधाकर शृंगारे आणि मविआचे डॉ. शिवाजी काळगे यांच्यामध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे.

मागच्या कांही दिवसाचा आढावा घेतला तर ही निवडणूक एकांगी होण्याची चिन्हे दिसत होती कारण मविआच्या उमेदवाराचा प्रचार विजयाच्या दिशेने सुरू होताना दिसत आहे.
सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी महायुती सरकारचे अनेक बडे नेते आपली सर्व शक्ति पणाला लावतह्याना दिसले होते पण लातूरची जागा निवडून आणण्याची जबाबदारी माझी म्हणून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
लातूर लोकसभा निवडणूक मतदारसंघामध्ये आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख फिरत आहेत. मराठा समाजामध्ये भाजप विरूद्ध तीव्र रोष उदगीर विधानसभा मतदार संघातील सर्व सामान्य जनतेत दिसून येत आहे.

मराठा समाजाच्या लोकांशीसंपर्क केला असता भाजपाला मराठा समाजाचे मतदान होणार नाही अशीच चर्चा होताना दिसून आली. म्हणून मतदारसंघात मराठा फॅक्टर महत्वाचा ठरू लागला आहे. शृंगारे यांनी गेल्या पाच वर्षात ग्रामीण मतदारांकडे पाठ फिरवली असून जनतेच्या अडचणी समजून घेतल्या नाहीत. ते स्वता:मध्येच गुंतवून राहिले अशी चर्चा सर्व सामान्य मतदारसंघामध्ये होताना दिसत आहे. त्यातच भर म्हणजे भाजपने देशात सत्ता स्थापन केल्या नंतर आश्वासनाची खैरात करीत विदेशातला काळा पैसा भारतात आणून प्रत्येकांच्या खात्यावर १५ लाख जमा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. उलट इलेक्टोरल बॉन्डच्य रूपाने काळा पैसा भगवा झाल्याचे दिसून येत आहे.

देशाचा अमृतमहोत्सव साजरा होत आसताना आपली मानवी व संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवली जात आहे. अल्पसंख्याक ,आदिवासी दलित ,ओबीसी, व महिलांवरील आत्याचारात वाढ झाली आहे. देशातील लोक कल्याणकारी योजना अर्थ व्यवस्था मोडून देशाचे अर्थकारण मुठभर लोकांच्या हाती सोपविले आहे. त्यामुळे बेरोजगारी शिगेला पोहचली आहे.देशातील शेतकरी व छोट्या उद्योग व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. भाजपने महाराष्ट्रात येणारे मोठमोठे उद्योगधंदे गुजरातला नेले आहेत.

पुन्हा सत्तेत येण्यासाठी नेत्यांना ईडीची भीती दाखवून आपल्या पक्षात प्रवेश देऊन त्यांना क्लीन चीट देण्याचा सपाटा चालवला असून त्यांना महत्वाची पदे व मंत्रीपदे दिली जात आहेत.
अजित पवारांना ‘चक्की पिसिंग…पिसिंग’ म्हणणारे अशोक चव्हाणांच्या आदर्श घोटाळ्यावर टिका करणारे खोटारडे ठरल्यामुळे भाजपाचा कार्यकर्ता अडचणित आला आहे. आज पर्यंत ज्यांना विरोध केला त्यांचा प्रचार कसा करावा असा प्रश्न निर्माण कार्यकर्त्याला पडला आहे.

भाजपचे आदर्श अटलबिहारी वाजपेयी सरकार अल्पमतात आले तेव्हा म्हणाले होते, इतर पक्ष तोडून -मोडून अथवा भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन होत असेल तर अशा सत्तेला मी चिमट्याने सुद्धा शिवणार नाही.
तसेच गोध्रा हत्त्याकांडात त्यांनी राजधर्म पाळण्याचा दिलेला सल्ला याचा भाजपाला विसर पडला आहे.हे फक्त सत्ता टिकविण्यासाठी जातीवादी, भ्रष्ट नितिचा वापर करित आहेत हे सुजाण मतदार जाणून आहेत .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR