36.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeलातूरस्वाधार केंद्रातील पायाभूत सुविधांंचे उद्घाटन

स्वाधार केंद्रातील पायाभूत सुविधांंचे उद्घाटन

लातूर : प्रतिनिधी
दिव्यांग पुनर्वसनाच्या क्षेत्रात लातूर पॅटर्न निर्माण करणा-या ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठाण संचलित स्वाधार अंध, अपंग प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रातील विविध उपक्रम आणि लाभार्थी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यासाठी स्वाधार केंद्रातील पायाभूत सुविधा वाढवण्याची नितांत आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेऊन टेनेको  ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रमांतर्गत स्वाधार केंद्रांमध्ये पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला.
या अंतर्गत स्वाधार केंद्रातील वस्तीगृह, प्रशिक्षण इमारत, अंतर्गत रस्ते, उत्पादन केंद्र,  संरक्षण भिंत, पाणी साठवण आणि सौर ऊर्जा या पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या. या विकसित केलेल्या सुविधांचा मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन दि. १८ मार्च रोजी झाले.  या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने, टेनेको कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आर सी सुब्रमण्यम, पर्चेंिसग डायरेक्टर प्रवीण सिंग, सेल्स डायरेक्टर वैभव जोशी, कंपनी सेक्रेटरी मयुरी रामदासी, सिनियर एच. आर. मॅनेजर किरण ढमढेरे, सी एस आर प्रोजेक्ट लीड निखिल जोगदंड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिश्चंद्र सुडे, कार्यकारी विश्वस्त प्रशांत सुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे विश्वस्त, कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR