34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनवी मुंबईत भीषण अपघातात १ ठार, २ गंभीर

नवी मुंबईत भीषण अपघातात १ ठार, २ गंभीर

नवी मुंबई : नवी मुंबईतील उलवे येथे एक कार आणि ट्रकची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी दिली.

दरम्यान, गुरुवारी (२३ नोव्हेंबर) मध्यरात्री उलवेजवळ हा अपघात झाला. एक कार उलवे येथून बेलापूरच्या दिशेने जात असतानाच कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले अन् ती कार समोर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर ती कार पुढे जाऊन एका स्कूटीला धडकली. यात स्कूटीचालक आणि कारचालक दोघेही गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेत त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR