31.7 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeराष्ट्रीयतब्बल ३९ हजार कोटींचे ५ संरक्षण संपादन करार

तब्बल ३९ हजार कोटींचे ५ संरक्षण संपादन करार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी सशस्त्र दलांच्या लढाऊ क्षमतेच्या बूस्टर डोसमध्ये वाढ झाली आहे. ब्रम्होस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे, रडार, शस्त्रास्त्र प्रणाली आणि मिग-२९ जेटसाठी एरो-इंजिनसह सशस्त्र दलांच्या लढाऊ क्षमतांना चालना देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताने ३९,१२५ कोटी रुपयांच्या ५ प्रमुख संरक्षण संपादन करारांवर शिक्कामोर्तब केले.

मेक इन इंडिया उपक्रमाला आणखी चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने ३९,१२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ५ मोठ्या भांडवल संपादन करारांवर स्वाक्षरी केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत या करारांची देवाणघेवाण झाली.

मिग-२९ विमानांसाठी एरो इंजिन खरेदीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेडसोबत ५ करारांपैकी पहिला करार करण्यात आला आहे. क्लोज-इन-वेपन सिस्टीम आणि उच्च क्षमता रडारच्या खरेदीसाठी लार्सन अँड टुब्रो लिमिटेडसोबत दोन करार करण्यात आले आहेत. भारतीय सशस्त्र दलांसाठी ब्रम्होस क्षेपणास्त्र आणि जहाजावर आधारित ब्रम्होस प्रणालीच्या खरेदीसाठी ब्रम्होस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडसोबत २ करार करण्यात आले आहेत. या करारांमुळे स्वदेशी क्षमता मजबूत होण्यास मदत होईल आणि परकीय चलनही वाचेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. या करारामुळे भविष्यात परदेशावरील अवलंबित्व कमी होईल.

हे आहेत महत्त्वाचे करार
-सर्वात मोठा करार १९,५१९ कोटी रुपयांचा होता. यामध्ये भारत-रशियन संयुक्त उपक्रम ब्रम्होस एरोस्पेसकडून ४५० किमी विस्तारित श्रेणीसह २२० ब्रम्होस सुपरसोनिक्ससाठी कराराचा समावेश आहे.

-ब्रम्होस वर्टिकल लॉन्च सिस्टीमसाठी ९८८ कोटी रुपयांचा आणखी एक करार होता.

-खाजगी क्षेत्रातील कंपनी एल अ‍ॅण्ड टी सोबतच आयएएफचे दोन करार करण्यात आले.

-पहिला करार ७,६६९ कोटी रुपयांचा होता. ज्या अंतर्गत क्लोज-इन वेपन सिस्टमच्या ६१ फ्लाइट्स खरेदी केल्या जातील. दुसरा करार ५,७०० कोटी रुपयांच्या १२ हाय पॉवर रडारसाठी करण्यात आला. हे रडार चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या विद्यमान लांब पल्ल्याच्या आयएएफ रडारची जागा घेतील.

-पाचवा करार मिग-२९ लढाऊ विमानांच्या आरडी-३३ एरो इंजिनसाठी होता, ज्याची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स रशियाच्या मदतीने ५,२५० कोटी रुपयांमध्ये करणार आहे. या करारांतर्गत ८० नवीन इंजिन तयार केले जातील, ज्यामुळे आयएएफ ताफ्यातील ६० ट्विन इंजिन मिग-२९ ची ऑपरेशनल क्षमता वाढेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR