38.3 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeपरभणीचिंचोली दराडेत शेतमजूराची आत्महत्या

चिंचोली दराडेत शेतमजूराची आत्महत्या

जिंतूर : जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे येथील शेतमजूर लक्ष्मण दशरथ दांडगे (वय ४२ वर्षे) यांनी दि.१ मार्च मध्यरात्रीच्या सुमारास स्वत:च्या राहत्या घरातील लोखंडी रॉडला रुमाल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांना दि.२ मार्च रोजी सकाळच्या सुमारास दिसून आले.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक बंदुके, पोलीस कॉन्स्टेबल पांचाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून भाजप ग्रामीण तालुकाध्यक्ष माधव दराडे, अर्जुन दराडे व ग्रामस्थांच्या मदतीने दांडगे यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. अजमत खान यांनी तपासून त्यांस मृत घोषित केले आहे. नेमके आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृतकाचे नातेवाईक पुणे येथे असल्याकारणाने सायंकाळपर्यंत शवविच्छेदन झाले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, ०४ मुली असा परिवार आहे. बातमी देईपर्यंत पोलिसांत कोणतीही नोंद झालेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR