38.9 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडाराजस्थान रॉयल्सचा निसटता विजय

राजस्थान रॉयल्सचा निसटता विजय

मोहाली : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पाचव्या विजयाची नोंद करून बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे. पंजाबकिंग्सनवर त्यांनी ७ विकेट्स राखून विजय मिळवला आणि सहा सामन्यांत १० गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. आरआरने सहज जिंकता येणारा सामना उगाच रंगतदार बनवला आणि पीबीकेएसला डोके वर काढण्याची संधी मिळाली. शेवटच्या षटकापर्यंत सामन्यातील चुरस कायम ठेवलेली. अर्शदीपने २० व्या षटकातील दोन चेंडू निर्धाव टाकली, परंतु शिमरोने हेटमायरने तिसरा चेंडू सीमापार पाठवले आणि ३ चेंडूंत ४ धावा असा सामना खेचून आणला.

पंजाब किंग्सला घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने संघर्ष करण्यास भाग पाडले. आवेश खान ( २-३४) व केशव महाराज ( २-२३) यांनी फफ ला मोठे यश मिळवले दिले. जितेश शर्मा ( २९) व लिएम लिंिव्हगस्टोन ( २१) यांनी पंजाबला सावरले. त्यानंतर आशुतोष शर्माने १६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ३१ धावा चोपून संघाला ८ बाद १४७ धावांपर्यंत पोहोचवले. ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल व कुलदीप सेन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. फफ ने पदार्पणाची संधी मिळालेल्या तनुष कोटियानने पहिल्या विकेटसाठी यशस्वी जैस्वालसह ५६ धावांची भागीदारी करू नदिली. तनुषने ३१ चेंडूंत ३ चौकारांसह २४ धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने त्याचा त्रिफळा उडवला.

इम्फॅक्ट प्लेअर म्हणून आलेला यशस्वी २८ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३९ धावांवर कागिसो रबाडाच्या गोलंदावीर झेलबाद झाला. कागिसोने त्याच्या पुढील षटकात पीबीकेएसला मोठी विकेट मिळवून देताना संजू सॅमसनला ( १८) पायचीत केले. कागिसोने ४ षटकांत १८ धावांत २ विकेट्स घेतल्या. आरआरचा संघ दडपणात खेळताना दिसला आणि पंजाबला पुनरागमन करण्याची संधी मिळाली होती. सॅम कुरनच्या गोलंदाजीवर रियान पराग याचा लिंिव्हगस्टनने सोडलेला सोपा झेल आरआरला फायद्याचा ठरणारा होता. पण, एका चुकीच्या फटक्यामुळे परागचा(२३) घात झाला आणि अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर कागिसोने चांगला झेल घेतला.

हर्षल पटेलने आरआरला सहावा धक्का दिला, ध्रुव जुरेल ६ धावांवर बाद झाला. आरआरला १६ चेंडूंत ३३ धावा करायच्या होत्या. पुढे शिमरॉन हेटमायरने ४ चेंडूंत १३ धावा चोपून सामना १२ चेंडूंत २० धावा असा जवळ आणला. रोव्हमन पॉवेल दुस-या बाजूने उभा होता. त्याने १९व्या षटकात सॅम कुरनच्या पहिल्या दोन चेंडूंवर खणखणीत चौकार लगावले. पण, तिस-या चेंडूवर बाऊन्सरवर कुरनने पॉवेलची ( ११) विकेट मिळवली. त्याच षटकात केशव महाराजची विकेट घेऊन कुरनने पंजाबला सामन्यात कायम राखले. ६ चेंडूंत १० धावा असा सामना रंगतदार होता. अर्शदीप सिंगने २० व्या षटकात प्रयत्न केला, परंतु शिमरोन हेटमारयने आरआरसाठी सामना जिंकला. राजस्थानने ३ विकेट्सने हा सामना जिंकला आणि हेटमायर १० चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २७ धावांवर नाबाद राहिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR