28.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeराष्ट्रीयभाजपाच्या स्टार प्रचारंकाच्या यादीत देवेंद्र फडणवीस

भाजपाच्या स्टार प्रचारंकाच्या यादीत देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. भाजपानेही जोरदार तयारी केली आहे. भाजपाने सभांचा धडाका सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशात सभांचा धडाका सुरू केला आहे, तर दुसरीकडे भाजपाने गुजरातसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातीलही नेत्यांचा समावेश आहे.

गुजरातमधील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एचएम अमित शहा, ईएएम एस जयशंकर, सीएम भूपेंद्र पटेल, राज्य पक्षप्रमुख सीआर पाटील, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR