28.6 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर्व सीमा सील

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर्व सीमा सील

दिल्ली : एमएसपीची मागणी रेटण्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्याच्या इशाऱ्यामुळे दिल्लीतून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या सर्व राज्यांच्या सीमांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील आंतरराज्य बस स्थानकांवर सुद्धा पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.

केंद्र व हरियाणा सरकारने आतापर्यंत ३० शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध केले आहे. याशिवाय दिल्लीत येणाऱ्या शेतकरी नेत्यांनाही सीमेवर किंवा दिल्लीत आल्यानंतर त्यांनी दिल्लीत स्थानबद्ध केले जाईल, असा इशारा दिल्ली पोलिसांनी दिला आहे.

पंजाब व हरियानाच्या सीमांवर शेतकऱ्यांनी हरियाना पोलिसांनी अडविले. शेतकरी संघटनांनी ६ मार्चला दिल्लीतील जंतरमंतवर आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. परंतु दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे.

शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊ नये, यासाठी दिल्लीच्या सिंघु बॉर्डर, टिकरी बॉर्डर व गाझीपूर सीमांवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. एवढेच नव्हे तर हरियाणा पोलिसांनी मार्ग अडविल्यामुळे इतर राज्यातील शेतकऱ्यांनी रेल्वे किंवा बसद्वारे दिल्लीत पोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यामुळे अनेक शेतकरी रेल्वे व बसने दिल्लीत पोचत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे आंदोलन अधिक तीव्र करून केंद्र सरकारचे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR