37 C
Latur
Monday, May 6, 2024
HomeFeaturedबॅलेट पेपरबाबतच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

बॅलेट पेपरबाबतच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

 

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरु होती. इव्हीएममध्ये नोंद झालेल्या १०० टक्के मतांची व्हीव्हीपॅटमधील पावत्यांशी पडताळणी करुन पाहण्याची मागणी करण्यात आली होती. बॅलेट पेपरबाबतच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशिनवरच निवडणुका होणार आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स मतांची त्यांच्या व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल स्लिप्ससह १०० टक्के पडताळणी करण्याच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून या याचिकांवर सुनावणी सुरू होती. न्यायालयाने आधी सांगितले होते की, बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे अवघड आहे, ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट यांच्या पडताळणीची मागणी केली होती. त्याबाबत निर्देश देऊन ते सुधारण्याची प्रक्रिया राबवली जाऊ शकते.

सर्वोच्च न्यायालयाने दोन निर्देश दिले आहेत – पहिला निर्देश म्हणजे चिन्ह लोडिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सिम्बॉल लोडिंग युनिट्स सील केले जावे आणि ते किमान ४५ दिवस ठेवावेत. याशिवाय दुसरा निर्देश म्हणजे अभियंत्यांची टीम मायक्रोकंट्रोलर युनिटची जुनी मेमरी तपासेल.

याआधी, दोन दिवसांच्या सलग सुनावणीनंतर खंडपीठाने याचिकांवरील निर्णय १८ एप्रिल रोजी राखून ठेवला होता. मात्र, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा नोंदवले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून काही गोष्टींबाबत स्पष्टीकरण मागवले होते. त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR