38.8 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडातनुष कोटियनकडून अष्टपैलू कामगिरी

तनुष कोटियनकडून अष्टपैलू कामगिरी

मुंबई : मुंबईने रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला. या विजेतेपदासह मुंबईने तब्बल ४२ वेळा चॅम्पियन बनण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. या रणजी मालिकेत मुंबई संघातील अनेक खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले आहे. पण २५ वर्षीय तनुष कोटियनचा परफॉर्मन्स असा होता की त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ऑफस्पिनर तनुषने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही अष्टपैलू कामगिरी केली आणि मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अंतिम सामन्यातही त्याने ७ फलंदाजांना तंबूत पाठवले.

या रणजी ट्रॉफी मालिकेत तनुष कोटियनला मुंबईसाठी नवव्या किंवा दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने केले असून नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर येऊनही या मालिकेत त्याच्या नावावर ५०० हून अधिक धावा आहेत. यासोबतच या मालिकेत मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा तो दुस-या क्रमांकाचा फलंदाज आहे. १० सामन्यांत तनुषला १४ डावांमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यात त्याने ४१.८३ च्या सरासरीने ५०२ धावा केल्या आहेत. तर दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने बडोद्याविरुद्ध १२० धावांची नाबाद खेळीही त्याच्या नावावर आहे.

गोलंदाजीतही केली उत्कृष्ट कामगिरी
ऑफस्पिन गोलंदाजी करणा-या तनुष कोटियनने रणजीच्या १० सामन्यांत १६९ षटकारांची गोलंदाजी करताना एकूण २९ विकेट घेतल्या आहेत. यात त्याने एकदा एका सामन्यात १० बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे. तर अंतिम सामन्याच्या दुस-या डावात शतक झळकावल्यानंतर विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडेकर खेळत होता. वाडेकरच्या चिवट खेळीमुळे मुंबई संघ चांगलाच तणावाखाली आला होता. मात्र, तनुषने मोक्याच्यावेळी वाडेकरला बाद करत अंतिम सामना मुंबईच्या खिशात घातला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR