34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयव्हॉट्सऍपने बंद केला प्रोफाईल पिक्चर स्क्रीनशॉट ऑप्शन

व्हॉट्सऍपने बंद केला प्रोफाईल पिक्चर स्क्रीनशॉट ऑप्शन

सॅन्नफ्रान्सिस्को : व्हॉट्सऍपचे जगभरात अब्जावधी यूजर्स आहेत. या मेसेज्ािंग ऍपवर यूजर्सना आपल्या प्रोफाईलला फोटो देखील ठेवता येतो. आपण इतरांचे प्रोफाईल पिक्चर पाहू शकतो. मात्र आता इतर कोणत्या व्यक्तीच्या फोटोचा स्क्रीनशॉट घेण्े यूजर्सना शक्य होणार नाही. आपल्या यूजर्सच्या प्रायव्हसीसाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये व्हॉट्सऍपने आपल्या यूजर्सच्या प्रायव्हसीबाबत कित्येक मोठे निर्णय घेतले आहेत. यातीलच एक मोठा निर्णय म्हणजे यूजर्सना आता इतरांच्या डीपी, म्हणजेच डिस्प्ले पिक्चरचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही. काही दिवसांपूर्वी या फीचरची चाचणी सुरू होती. मात्र आता हे फीचर सर्वांसाठी रोलआउट करण्यात आले आहे.

डीपीला असणा-या फोटोंचा स्क्रीनशॉट घेऊन त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे हे फीचर लाँच केले आहे. सध्या काही ठराविक स्मार्टफोनमध्ये हे लागू झाले असून, टप्प्या-टप्प्याने सर्वांनाच लागू होईल. यासाठी तुम्हाला तुमचे व्हॉट्सऍप अपडेट करावे लागणार आहे.

व्हॉट्सऍप नवीन लाँच झाले होतं तेव्हा यूजर्सना एकमेकांच्या डिस्प्ले पिक्चरचा फोटो सेव्हदेखील करता येत होता. मात्र २०१९ साली हे फीचर बंद करण्यात आले. यानंतर प्रोफाईल पिक्चरच्या सुरक्षेसाठी व्हॉट्सऍपने काही आणखी सेटिंग्स लाँच केल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR