38.5 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरबीडमध्ये वंचितकडून अशोक हिंगे उमेदवार

बीडमध्ये वंचितकडून अशोक हिंगे उमेदवार

बीड : बीडमध्ये शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली आणि सगळीच राजकीय परिस्थिती बदलून गेली. सोनवणेंच्या उमेदवारीमुळे पंकजांचा विजय सोपा झाल्याचे बोलले जात आहे. त्याचे कारण बजरंग सोनवणे हे दुसरे-तिसरे कोणी नसून धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते आहेत. उमेदवारी मिळण्याच्या काहीच दिवस अगोदर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता.

भाजपने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात बजरंग सोनवणे रिंगणात आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने रविवारी अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अशोक हिंगे हे बीडमधील मराठा चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते आहेत.

मराठा आरक्षण चळवळीचे दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे बीड लोकसभा लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. परंतु चर्चा कुठे फिस्कटली कळले नाही आणि पवारांनी बजरंग सोनवणेंना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर ज्योती मेटेंना वंचितचा पाठिंबा मिळेल असे बोलले जात होते. रविवारी वंचितनेही अशोक हिंगेंच्या रुपाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे ज्योती मेटे अपक्ष लढतील, असे बोलले जात आहेत. कारण त्या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. शेंडी तुटो वा पारंबी.. आता माघार नाही अशी भूमिका त्यांनी बोलून दाखवलेली आहे. शिवाय शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांचीही हीच मागणी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR