38.3 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयखैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले

खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात गेल्या दोन दिवसांत झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये एका वरिष्ठ पोलिस अधिका-यासह सहा सुरक्षा कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात १२ दहशतवादीही ठार झाले आहेत.

पाकिस्तान सशस्त्र दलाची मीडिया शाखा इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने सांगितले की, बलुचिस्तान प्रांतात चार दहशतवादी मारले गेले आहेत. ते पुढे म्हणाले की, खैबर पख्तूनख्वामधील डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील कुलाची तालुक्याच्या कोट सुलतान भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत आठ दहशतवादी मारले गेले. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. खैबर पख्तुनख्वाच्या लक्की मारवत येथे शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस उपअधीक्षक आणि दोन पोलिस ठार झाले, असे अधिका-यांनी सांगितले. यावेळी एक हवालदारही जखमी झाला. अधिका-यांनी सांगितले की, उपअधीक्षकांनी ईद उल फित्र सणापूर्वी सुरक्षा भक्कम करण्यासाठी पोलिस कर्मचा-यांसह पेशावर-कराची महामार्गावर एक तात्पुरती चौकी स्थापन केली होती.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी या चौकीतून जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी पोलिसांच्या वाहनांवरही गोळीबार केला, त्यात उपअधीक्षक आणि हवालदाराचा मृत्यू झाला. दरम्यान, शुक्रवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी सारा दर्गा भागात हवालदार सनमत खान यांच्यावर गोळीबार केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. बाजौर जिल्ह्यातील मामुंद तालुक्यात शनिवारी झालेल्या स्फोटात एक पोलिस अधिकारी ठार तर दुसरा जखमी झाला. याशिवाय शनिवारी रात्री टँक जिल्ह्यातील मियाँ लाल पोलिस चौकीजवळ एका हवालदाराची अज्ञातांनी हत्या केली होती. लक्की मारवत येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR