37.7 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeनांदेडनांदेड लोकसभा मतदारसंघात मराठा मतदान निर्णायक ठरणार

नांदेड लोकसभा मतदारसंघात मराठा मतदान निर्णायक ठरणार

नांदेड : निळकंठ वरळे
नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये दुरंगी लढत होत असून मराठा समाजाचे मतदान निर्णायक ठरणार आहेत. भाजप माहायुतीचे उमेदवार विद्यमान खा. प्रतापराव पाटील चिखलीकर ,काँग्रेस महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांच्यात खरी सामणा होणार आहे तर वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर यांनी ही प्रचारात आघाडी मारली आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून मतदार संघात तीनही पक्षप्रमुखानी प्रचारात आघाडी मारली घेतली. अनेक नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत. भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आठ दिवसांपूर्वी नायगाव परिसरामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झाली त्या पाठोपाठ नांदेडमध्ये शुक्रवारी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ खा. हंडोरे जाहीर सभा झाली आहे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी ऍड. प्रकाश आंबेडकर यांचीही जाहीर सभा घेण्यात आली आहे.

तिन्ही पक्षांचे उमेदवार कार्यकर्त्यांसह उमेदवार जोमाने कामाला लागलेत मात्र दोघात खरी लढल मानली जाते भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काही दिवसापुर्वी प्रवेश केल्यामुळे भाजपचे चित्र बंदलले आहे मात्र मराठा समाज सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जातोकी काय असे बोलले जात आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मतदानावर निवडणूक निर्णायक ठरणार आहे. ग्रामीण भागामध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे अनेक कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान अनेक गावांमध्ये रोखले आहे. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना अर्धापूर तालुक्यासह मुदखेड मुखेड तालुक्यातही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाविषयी जाब विचारात घेराव घातला त्याच बरोबर माहितीचे उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनाही समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाविषयी जाब विचारले आहेत. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार चव्हाण यांच्या बाजूने मराठा समाजाचे . मत वि भागले तर तर निकाल कॉग्रेसच्या बाजुणे लागेल मात्र दोघोंही उमेदवार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे मराठा समाज कोनती भुमीका घेईल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

वंचित आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. गावागावात जाऊन उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते विचाराला जोर मारत आहे. अनेक वंचितचे कट्टर वादी कार्यकर्ते यांचे मत त्यांच्या बाजूने पडेल असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. तर एकंदरीत व भाजप व काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना होईल जानकार बोलत आहेत. मतदार वेळ प्रसंगी काय निर्णय घेतील अद्याप स्पष्ट सांगता येणार नाही. मात्र आटीतटीचा सामणा होत आहे. शेवटच्या दीसापर्यत सागता येत नाही शनिवारी भाजप माहायुतीचे उमेदवार विद्यमान खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ प्रधानमंत्री नरेद्र मोदी याची जाहीर सभा नांदेडला होणार आहे. त्यामुळे भाजपचे चित्र बदलू शकते.
२६ एप्रिलला मतदान होणार असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान जनजागृती राबवली आहे. निवडनुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. घरो घरी जाऊन मतदान करण्याचे आव्हाण केले आहे. जवळपास ९९ टक्के मतदान होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR