36.3 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरभाजप नगरसेवकाची गाडी अडवली, पीएसआयची कंट्रोल रूमला बदली

भाजप नगरसेवकाची गाडी अडवली, पीएसआयची कंट्रोल रूमला बदली

छत्रपती संभाजीनगर : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर सर्वसामान्यांकडून दंड आकारला जातो मात्र लोकप्रतिनिधींना सर्व नियम माफ आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा माजी नगरसेवकाला विरुद्ध दिशेने जाऊ न दिल्याने पीएसआयची कंट्रोल रूमला बदली करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसाला कर्तव्य बजावल्याची शिक्षा मिळाली, अशा प्रतिक्रिया या घटनेनंतर येत आहेत.

वाहन चालवताना वेग हा रस्त्याची स्थिती, रहदारी व वाहनाची स्थिती लक्षात घेऊन मर्यादित ठेवावा. अति वेगाने वाहन चालवल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा वाहनचालकांची चिडचिड होते. त्यामुळे अनेकदा भांडणेदेखील होतात. हे सर्व प्रकार होत असताना वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात येते. मात्र नियमांचे पालन करणा-या पोलिसांवर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रॅलीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. शिवजयंतीला भाजपा माजी नगरसेवकाला साईडने न जाऊ देणा-या पीएसआयची कंट्रोल रूमला बदली करण्यात आली आहे. पोलिसांना कर्तव्य बजावण्याची शिक्षा मिळाली आहे. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांची पीएसआय सचिन मिरधे यांनी कंट्रोल रूमला बदली केली आहे.

शिवजयंतीच्या दिवशी मोटारसायकल रॅली निघाली असता भाजपाचे माजी नगरसेवक अनिल मकरिये हे विरुद्ध दिशेने जाऊ द्या अशी मागणी करत होते. पोलिसांनी अडवल्याने त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र भाजपा नगरसेवकाला विरुद्ध दिशेने जाऊ न दिल्याची आणि कर्तव्य बजावल्याची पीएसआयला शिक्षा मिळाली असून त्यांची कंट्रोल रूमला बदली केली गेली.

वाहतुकीचे नियम पाळावेत यासारख्या सूचना पोलिसांकडून दिल्या जातात. मात्र, लोकांचे प्रतिनिधित्व करणारे नियम तोडत असतील तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार, याची दखल कोण घेणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR