28.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनटीला नटीच म्हणणार ना?

नटीला नटीच म्हणणार ना?

सांगली : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपच्या अमरावतीमधील उमेदवार नवनीत राणा यांना डान्सर आणि बबली म्हटले. यावर त्यांनी सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकीवेळी पुन्हा एकदा वक्तव्य केले. नटीला नटीच म्हणणार ना अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांची सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीवेळी अनौपचारिक गप्पांमध्ये राऊतांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा विषय निघाला. त्यावेळी संजय राऊत आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण देताना म्हणाले की, नटीला नटी म्हणायचं नाही तर काय म्हणायचे. राऊतांच्या प्रतिक्रियेवर जयंत पाटील म्हणाले की, नाच्या, नाची हे मराठी शब्द आहेत. त्यानंतर संजय राऊत म्हणाले की, ती डान्सर आहे. आपण गणपत पाटील यांना प्रेमाने नाच्या म्हणत होतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR