33.2 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रकेसाने आमचा गळा कापू नका

केसाने आमचा गळा कापू नका

रामदास कदमांचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई : लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी समसमान जागावाटपाची मागणी केली आहे तर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी थेट भाजप नेत्यांना इशारा दिला आहे. केसाने आमचा गळा कापू नका, विश्वासघात करू नका, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघात माझ्या मुलाच्या विरोधात भाजपने युती असताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेला उघडपणे मतदान केले. २०१९ मध्ये युती असतानाही भाजपने मला पाडले, हे वास्तव आहे. आता देखील युती असतानाही आम्ही मोठा निर्णय घेत भाजपसोबत आलो आणि मंत्रिमंडळ स्थापन केले. मोदी, शहांकडे बघून आम्ही भाजपसोबत आलो, पण पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला, तर माझेही नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा, असे म्हणत रामदास कदमांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.

रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप
युती असताना आम्ही इतका मोठा निर्णय घेतला. विश्वासाने भाजपासोबत आलो आणि मंत्रिमंडळ बनलं. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण स्थानिक आमदारांना भूमिपूजन आणि लोकार्पणात बाजूला ठेवत त्यांना त्रास देत आहेत, असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केला आहे. रत्नागिरी, रायगड, मावळ, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात भाजपचे घृणास्पद राजकारण सुरू आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेना-भाजप यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपकडून प्रयत्न
लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या फरकाने मोदी पंतप्रधान होतीत, असे म्हणत रामदास कदमांनी मनातील एक खंत बोलून दाखवली आहे. कदम म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी मोदी-शहांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही भाजपसोबत आलो आहोत. आमचा विश्वासघात होणार नाही, याची त्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR