35.6 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeधाराशिवधाराशिव नगर पालिकेची फसवणूक करणा-या डॉ. बलवंडे यांच्यावर गुन्हा

धाराशिव नगर पालिकेची फसवणूक करणा-या डॉ. बलवंडे यांच्यावर गुन्हा

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव शहरातील डॉ. श्रीकांत बब्रुवान बलवंडे यांनी नगर परिषद हद्दीत जमिन खरेदी करून प्लॉटींग केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार नगर परिषदेला काही क्षेत्राचे हस्तांतरण केले. त्यानंतर तब्बल १८ वर्षानी चुक दुरूस्तीच्या नावाखाली दस्त तयार करून चतुर्सिमा बदलल्या. नगर परिषद व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. श्रीकांत बलवंडे यांच्या विरोधात दि. २४ एप्रिल रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील डॉ. श्रीकांत बब्रुवान बलवंडे यांनी नगर परिषद विकास आराखडा हद्दीत असलेली ३० गुंठे जमीन खरेदी केली.

नगर रचना व मुल्यनिर्धारण विभागाची रितसर मान्यता घेऊन त्यांनी प्लॉटींग केली. त्यापैकी नगर परिषदेला ९८८ चौ.मीटर क्षेत्राचे खुली जागा (ओपन स्पेस) खरेदीखत करून हस्तांतरीत केले. त्यानंतर तब्बल १८ वर्षानी चुक दुरूस्तीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे दस्त तयार करून जमिनीचे मुळ मालक चंद्रकांत रंगनाथ काकडे यांचे क्षेत्र असल्याचे दाखवून चुकीच्या चतुर्सिमा दाखविल्या. डॉ. बलवंडे यांनी धाराशिव नगर परिषदेची व शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी नगर परिषदेचे रचना सहाय्यक सचिन राजेंद्र गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाणे येथे आरोपी डॉ. श्रीकांत बलवंडे यांच्या विरोधात दि. २४ एप्रिल रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR