35.6 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रवाशिमचा गजरे जेईई मेन्स परीक्षेत देशात प्रथम

वाशिमचा गजरे जेईई मेन्स परीक्षेत देशात प्रथम

शेतात राबणा-या आई-वडिलांच्या कष्टाचे पठ्ठयाने चीज केले

वाशिम : जेईई मेन्स परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे विदर्भातील निलकृष्ण गजरे या विद्यार्थ्याने यामध्ये बाजी मारली आहे. गजरे हा देशात पहिला आला असून शेतक-याच्या मुलाने मिळवलेल्या या उत्तुंग यशाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

वाशिम जिल्ह्यातील मूळचा रहिवासी असलेला निलकृष्ण गजरे याने नागूपरमध्ये राहून जेईईचा अभ्यास केला आणि हे यश मिळवले. निलकृष्णचे वडील वाशिममधील शेतकरी आहेत, तर आई गृहिणी आहे. तसेच त्याला एक लहान बहिणही आहे. निलकृष्ण हा लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी राहिला आहे.

दहावीत तब्बल ९७ टक्के मार्क्स मिळवत त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला त्यानंतर त्याने आयआयटीमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेण्यासाठी त्याने जेईई परीक्षेसाठी तयारी सुरु केली. त्यानुसार सलग दोन वर्षे कठोर मेहनत केल्यानंतर त्याला यंदाच्या जेईईच्या मेन्समध्ये घवघवीत यश मिळाले आहे. १०० पर्संटाईल मिळवून तो देशात पहिला आहे. यानंतर आता जेईई अ‍ॅडव्हान्स ही परीक्षा देण्याचे आपले ध्येय असल्याचे त्याने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR