40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयजपानमध्ये भूकंपाचे हादरे

जपानमध्ये भूकंपाचे हादरे

टोकीयो : जपानमध्ये २१ मार्च रोजी ५.३ तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे बसले. त्या दिवशी चित्रपट निर्माते एसएस राजामौली आणि त्यांचा मुलगा जपानमध्ये होते. सुदैवाने दोघेही बचावले आहेत. ते दोघेही २८व्या मजल्यावर होते.

चित्रपट निर्माते एसएस राजामौली आणि त्यांचे चिरंजीव एसएस कार्तिकेय जपानमधील भूकंपात थोडक्यात बचावले आहेत. गुरुवार, दि. २१ मार्च रोजी जपानमध्ये भूकंपाचा धक्का बसला होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.३ इतकी नोंदवली गेली आहे. एसएस कार्तिकेय यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या स्मार्ट वॉचमध्ये भूकंपाचा अलर्ट दाखवला. त्यानंतर काही वेळातच ५.३ च्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्का बसले. राजामौलींच्या मुलाने सांगितले की, ज्यावेळी भूकंप झाला त्यावेळी ते आणि आरआरआरची संपूर्ण टीम इमारतीच्या २८व्या मजल्यावर होती.

एसएस कार्तिकेय यांनी वर फोटो शेअर केला. ते लिहितात, आत्ता जपानमध्ये भूकंपाचा धक्का बसला. आम्ही २८ व्या फ्लोअरवर होतो. जमीन हळूहळू हलू लागली होती. हा भूकंप आहे, हे कळायला आम्हाला जरा वेळ लागला. कार्तिकेय यांनी पुढे सांगितले, मी मोठ्याने ओरडणारच होतो. परंतु आमच्या आजूबाजूला जे जपानी लोक होते त्यांना काहीही फरक पडला नाही. ते अशा पद्धतीने रियाक्ट झाले की, जणू पाऊस येणार आहे.

दरम्यान, जपानच्या हवामान विभागाने गुरुवारी माहिती दिली की, जपानच्या पूर्व भागातील इबाराकी येथे ५.३ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के अनुभवले गेले आहेत. देशात मागच्या काही वर्षांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे १ जानेवारी रोजी जपानमध्ये भूकंपाचे २१ धक्के बसले होते. ज्यातील एकाची तीव्रता ७.६ इतकी होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR