37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeउद्योगअर्थव्यवस्था सुसाट

अर्थव्यवस्था सुसाट

नवी दिल्ली : प्रतिनिधी
चालू आर्थिक वर्षातील तिस-या तिमाहीत ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे ८.४ टक्के इतके राहिले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. गेल्या तिमाहीत जीडीपीचा दर ८.१ इतका होता. अर्थव्यवस्थेचा हा आकडा अंदाजापेक्षा अधिक आहे. देशातील मॅन्युफॅक्चरिंग अ‍ॅक्टिव्हिटीज आणि सरकारी खर्चातील तेजी यामुळे जीडीपीचा वेग आणखी वाढला आहे. यापूर्वीच्या तिमाहीतील जीडीपीचा वेग आणखी वाढला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत विकासाचा दर ६.५ टक्के इतका असेल, असा अंदाज वर्तवला होता. जीडीपीमधील मजबूत वाढ ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत आहेत. अर्थव्यवस्था वाढीचा हा वेग लक्षात घेऊन २०२३-२४ च्या अंदाजात बदल करण्यात आले आहेत. याआधी हा दर ७ टक्के इतका होता तो आता ७.६ इतका करण्यात आला आहे. अर्थशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था ६.६ टक्के इतक्या वेगाने वाढले. मात्र प्रत्यक्षात हे सर्व अंदाज चुकीचे ठरले.

अत्यंत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिक बँकेपासून आयएमएफपर्यंत सर्वांनीच कौतुक केले आहे. मागच्या तिमाहीतील आकडेवारीदेखील तेच दर्शविते. नव्या आकडेवारीनुसार डिसेंबरच्या तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन वेगाने वाढले आहे.

भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणा-या अर्थव्यवस्थांपैकी एक
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणा-या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षाचा विकास दर ७.३ इतका वर्तवला आहे. जगभरातील चीन आणि युरोपातील अनेक देशांसमोर आर्थिक संकट असताना भारताने मात्र विकासाचा वेग कायम ठेवला आहे. चीनची अर्थव्यवस्था अद्याप धिम्यागतीने वाढत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR