40.8 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरपथनाट्याद्वारे मतदारांचे प्रबोधन

पथनाट्याद्वारे मतदारांचे प्रबोधन

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यात १३ मे रोजी होणा-या लोकसभेच्या निवडणुकीत महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, महिलांची मतांची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषद प्रशाला गणोरी येथे महिलांचा मेळावा घेऊन गुरुवारी (ता.२५) रोजी जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पथनाट्य सादर करून उपस्थितांना प्रोत्साहित केले. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका उत्कर्षा देशमुख यांनी इथिकल वोटिंग बाबतीत विद्यार्थ्यांच्या मदतीने सुंदर प्रबोधन केले.

स्वीप कक्षाचे सहाय्यक जगन ढोके यांनी जनजागृती गीत गायन करून उपस्थितांना मतदानासाठी उद्युक्त केले. देविदास तुपे यांनी नारी शक्तीचे गुणगान कवितेतून व्यक्त केले. शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन यांनी मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले तर गटशिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्षप्रमुख क्रांती धसवाडीकर यांनी महिलांनी मतदानाच्या या महान कार्यात आपले भरभरून योगदान द्यावे आणि महिलांनी लोकशाहीच्या या उत्सवात एखादा सण जसा साजरा केला जातो तसे सजून धजुन सहभागी व्हावे असे आवाहन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR