39 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeलातूरलोकहितासाठी डॉ. काळगे यांना निवडून द्या

लोकहितासाठी डॉ. काळगे यांना निवडून द्या

लातूर : प्रतिनिधी
सरकारने सर्वसामान्य माणसाच हित सांभाळले पाहिजे,आपल्या कामातून जनता सुखी समाधानी झाली पाहिजे. या भुमीकेतून लोकनेते विलासराव देशमुख यांनी काम केली आहे, त्यांचा  वारसा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण तथा कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख समर्थपणे चालवत आहेत. या भुमिकेतून लोकांच्या हिताचे काम करणारा उमेदवार निवडून देण्यासाठी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे  यांना मतदान करावे असे आवाहन, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जवळा (बु), कासारजवळा येथील महिला संवाद बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, सौ. सुनीताताई आरळीकर, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष दैवशाला राजमाने आदी उपस्थित होते. वैशालीताई देशमुख म्हणाल्या की, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी मांजरा परीवार व जिल्हा मध्यवर्ती बँक शेतक-यांंच्या हिताचे काम करीत आहे. सद्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. या लोकसभा निवडणूकीत डॉ. काळगे हे उच्चशिक्षीत व सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले, त्यांच्या प्रश्नांची जाण असणांरे उमेदवार आहेत. त्यांना मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
त्या म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाच्या गेल्या दहा वर्षातील कामाकाजाला आणि एकाधीकारशाहीला जनता कंटाळली आहे. गेल्या दहा वर्षांच्या सरकारच्या कालावधित संविधान धोक्यात आले आहे असे पाहयला मिळत आहे. याप्रसंगी विलास सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोंिवंद बोराडे, विकासरत्न विलासराव देशमुख सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैलास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य किसनराव लोमटे, संचालक भैरवनाथ सवासे, दत्ता शिंदे, उपसरपंच मनोज कापरे, कासारजवळाचे सरपंच महेश हावळ, सौ. संगीताताई ब्याळे, विजयकुमार चोंडे, राम राजमाने, संतोष लोमटे, पप्पू चौंडे, सिंंधू सव्वाशे, जयश्री चोंडे, विमल भुजबळ, अनुसया बंडगर, आदीसह जवळा, कासार जवळा येथील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या, प्रास्ताविक पत्रकार दत्ता बनाळे यांनी केले तर आभार भैरवनाथ सवासे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR