32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यामाजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप!

माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप!

मुंबई : मुंबई हायकोर्टाने माजी पोलिस आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता रद्द केली आहे. २००६ च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

नोव्हेंबर २००६ च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणातील १२ आरोपींना ट्रायल कोर्टाने ठोठावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. ट्रायल कोर्टाने १३ अन्य आरोपींना दोषी ठरवले होते आणि प्रदीप शर्माची निर्दोष मुक्तता केली होती.

परंतु हायकोर्टाने प्रदीप शर्माची निर्दोष सुटका रद्द केली आणि पुराव्याच्या मालिकेच्या आधारे त्याला दोषी ठरवले. एकूण १३ आरोपींना हायकोर्टाने दोषी ठरवले आहे. प्रदीप शर्मा हे अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातीलही आरोपी आहेत.

कोण आहेत प्रदीप शर्मा?
प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत एक अधिकारी होते. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नावावर १०० हून अधिक चकमकींचा विक्रम आहे. ते १९८३ मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले आणि २०१९ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

प्रदीप शर्मा यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. यानंतर, २५ फेब्रुवारी २०२१ रोजी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घरातील अँटिलिया बाहेर स्फोटक पदार्थ सापडल्याच्या प्रकरणामुळे ते चर्चेत आले. याप्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला अटक करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR