38.8 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडासुवर्णपदक विजेत्याची केली हकालपट्टी

सुवर्णपदक विजेत्याची केली हकालपट्टी

पतियाळा : पतियाळा येथील महिला खेळाडूंच्या हॉस्टेलमध्ये रात्रीच्या वेळी प्रवेश करत असल्याचे दिसून आला. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता वेटलिफ्टर अंचिता सेऊली याची पॅरिस ऑलिम्पिक तयारीसाठी सुरू असलेल्या कॅम्पमधून हकालपट्टी करण्यात आली.

महिला हॉस्टेलच्या सुरक्षारक्षकाने अंचिका सेऊलीचा या हॉस्टेलमध्ये प्रवेश करत असताना व्हिडीओ काढला आणि संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिस्तपालन समिती तेथे दाखल झाली. अशा प्रकारची शिस्तभंगता आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यामुळे आम्ही त्याला कॅम्पमधून तत्काळ बाहेर जाण्यास सांगितले, असे भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या पदाधिका-याने सांगितले.

पतियाळा येथील एनआयएस आणि क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक विनीत कुमार यांना तात्काळ परिस्थितीची माहिती देण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ असल्याचे त्यांना सांगण्यात आले; परंतु सध्या तरी क्रीडा प्राधिकरणाने चौकशी समिती स्थापन केलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR